नोकरीचे आमिष; एकाला अटक

0

जळगाव । लंडन येथील जॉर्ज हॉटेलमध्ये वेटर, रूम अटेन्डस या पदावर नौकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोघांची 26 लाख 83 हजार 56 रुपयांची फसवणुक झाली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी संशयित गौरवसिंग सुरेशकुमार पटेल याला मंगळवारी अटक केली असून त्याला न्यायाधीश के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता 23 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

26 लाख 83 हजारांची केली होती फसवणूक
धर्मराज रघूनाथ जाधव यांचा मुलगा मुकेश व विश्‍वास तायडे यांचा मुलगा भुषण यांना लंडन येथील जॉर्ज हाटेलमध्ये वेटर व रूम अटेडन्स या पदावर नौकरी लावून देता असे आमिष दाखवून आठ जणांनी वेगवेगळ्या खात्यावर पैसे मागवून धर्मराज जाधव व विश्‍वास तायडे यांची 26 लाख 83 हजार 83 रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी 23 डिसेंबर 2014 आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, जिल्हा पेठ पोलिसांनी याप्रकरणी आज मंगळवारी गौरवसिंग सुरेशकुमार पटेल (वय-30 रा. गौरी ता. खैरा कनकेसरा जि. रेवा.मध्यप्रदेश, हमु.खिसोरा रोड, जि. अकलतारा) याला अटक केली. यानंतर संशयिताला मंगळवारी दुपारी न्यायाधीश के.एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्या. कुलकर्णी यांनी संशयितास 23 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.