नोकरीचे आमिष दाखवत घातला सव्वा पाच लाखाना गंडा

0

कल्याण : कल्याण पुर्वेकडील काटेमनिवली हनुमान नगर परिसरात वैष्णवी अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या तक्रारदाराचा मुलगा नोकरीच्या शोधात होता .

यादरम्यान सप्टेंबर 2013 रोजी तक्रार दाराची ओळख कल्याण पश्चिमेकडील आरटीओ परिसरात गोवर्धन टॉवर मध्ये राहनार्य हिरालाल वर्मा व अजय वर्मा या बापलेकाशी झाली .हिरालाल वर्मा यांनी त्यांना मुलाला नोकरी लावून देतो वझे आमिष दाखवत गेल्या तीन वर्षात त्यांच्याकडून 5 लाख 25 हजार रुपये उकळले .मात्र पैसे देऊ बराच कालावधी लोटला मात्र नोकरीबाबत काहीच हालचाल न झाल्याने त्यांनी वर्मा यांना जाब विचारला मात्र त्याने उडावा उडवी ची उत्तरे दिल्याने तक्रार दार याना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनि हिरालाल वर्मा व अजय वर्मा या बापलेकाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे