शहादा । विदेशात नोकरीचे आमिष दाखवून नंदुरबार जिल्ह्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांची विदेशात पाठवून धुळे येथील एलबीए प्लेसमेंट एजन्सीने फसवणूक केली आहे. अनेक बनावट कागदपत्रे आणि केलेल्या करारनाम्याप्रमाणे काम न मिळाल्याने अनेक विद्यार्थी विदेशात आडकून आहेत. शहादा तालुक्यातील विद्याविहार येथील सोमेश्वर रविंद्र पाटील एका वर्षापासून मलेशियात होता. आता त्याला भारतात आणण्यात कुटुंबियांना यश आले आहे. मात्र, सोमेश्वर प्रमाणे अनेक मुल एजन्सीने विदेशात पाठविले असून त्यांची हि सुटका करण्याची मागणी सोमेश्वरच्या पालकांनी केली आहे.नंदुरबार जिल्ह्यातील विद्याविहार ता. शहादा येथिल सोमेश्वर रवींद्र पाटील याने फायर सेफ्टी डिप्लोमा केला. त्यानंतर त्याला नोकरीची गरज होती. काही मित्राच्या संपर्कातून धुळे येथील एलबीए प्लेसमेंट एजन्सी चे संचालक प्रकाश गोरख पाटील यांच्याशी त्याची भेट झाली. त्यांनी त्याला मलेशिया येथील एका मोठ्या कंपनीत नोकरी लावून देतो असे सांगितले.
आर्थिक फसवणूक करून अनेक कष्टाची कामे घेतली करून
नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना विदेशात घेऊन जाऊन त्यांची आर्थिक फसवणूक करून त्याच्या कडून अनेक कष्टाची कामे करून घेणार्या एलबीए प्लेसमेंट एजन्सीच्या विरोधात सरकारने कडक पाऊले उचलावीत आणि एलबीए प्लेसमेंटच्या संचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. अशी मागणी त्यांच्या कुटुंबातील लोक करीत आहे.असाच अनुभव एलबीए प्लेसमेंट एजन्सीच्यामार्फत सिंगापूर येथे गेलेला आणि मोठ्या हिमतीने भारतात परत आलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील शिरुड ता. शहादा येथील विशाल पाटील या तरुणाचे अनुभव त्याने बोलतांना सांगितले.एका मित्राच्या मध्यस्थीने तो धुळे येथील एलबीए प्लेसमेंट या एजन्सीच्या माध्यमातून तो नोकरीसाठी सिंगापूरला गेला. त्यासाठी आगोदर त्याच्यासह तिघा मित्रांकडून लाखोरुपये प्रकाश पाटील यांनी घेतले. त्यांना त्याने टूरिस्ट व्हिसावर पाठविले. मात्र, त्या ठिकाणी त्यांना कंपनीत जॉब भेटला नाही. त्याने या ठिकाणी करून घेतलेले करारपत्र बनावट असल्याचे त्या ठिकाणी गेल्यावर लक्षात आले.
दुकानावर सेल्समन आणि काही घरात केअरटेकर
त्याठिकाणी या तरुणांना दुकानावर सेल्समन आणि काही घरात केअरटेकर म्हणून कामे देण्यात आली.असे विशाल पाटील पिडीत तरुणाने सांगेतले. भारतातून हे तरुण नोकरीसाठी सिंगापूर येथे गेल्यावर त्या ठिकाणी त्यांना घेण्यासाठी आलेल्या ह्या कंपनीच्या संपर्कातील लोकांनी त्यांच्याकडून व्हिसा पासपोर्ट व इतर कागदपत्रे हिसकवून घेतले.त्यानंतर त्यांना ते कधीच परत देण्यात आले नाहीत. मात्र, काही महिन्यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर विशाल पाटील यांनी हि बाब आपल्या कुटुंबियांना सांगितली. त्याच्या नातेवाईकाचे काही मित्र सिंगापूरला आहेत. भारतीय नागरिकाच्या मदतीने त्यांची सुटका करून त्यांना भारतात पाठविले मात्र त्याच्यासोबत अनेक तरुण कोण मलेशियात, सिंगापूर आणि अरब देशात पाठविण्यात आले आहेत. ते तरुण त्याठिकाणी आहेत. त्याचे खूप हाल असल्याचे सांगत त्यांना आपल्या देशात आण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीवजा तक्रार सोमेश्वरच्या पालकांनी विशालच्या मदतीने शहादा पोलीस ठाण्यात आज दि.17 जुलै रोजी दिली आहे.
आपले राहते घर विकून दिले पैसे
त्यासाठी एक लाख साठ हजार रुपये लागतील असे सांगितले. त्यानंतर त्यांच्या पालकांनी आपले राहते घर विकून त्याला पैसे दिलेत. मात्र, एलबीए प्लेसमेंट या एजन्सीने त्याला टुरिस्ट व्हिसा काढून तिथे पाठविले. मात्र, त्यांनी ज्या कंपनीचे नाव सांगितले त्यात जॉब मिळाला नाही. मात्र त्याठिकाणच्या काही स्थानिक एजन्सींनी सोमेश्वर याच्याकडून त्याचा पासपोर्ट आणि कागदपत्रे हिसकावून घेतल्यामुळे त्याला आपल्या मायदेशी परत येता येत नव्हते. सोमेश्वर कडील कागदपत्रे हिसकवून घेतल्यानंतर तो विनापासपोर्ट आणि व्हिसा काही महिने मलेशियात राहिल्यावर तो एकदिवस तेथील पोलिसाच्या तपासणीत बेकायदेशीर राहत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याला त्याठिकाणी दंडही झाला. गावातील पुरुषोत्तमनगर येथील सातपुडा साखर कारखान्याचे चेरमान दीपक पुरुषोत्तम पाटील यांच्या जावयाच्या व नातेवाईकाच्या सह्याने तिथे त्याला मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून त्याला भारतात आणले.
विदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीच्या आमिषाने कोणी विदेशात पाठवत असेल. तर त्यासंदर्भात योग्य ती खात्री करून घेणे जरुरीचे आहे. अनेक तरुणाची फसवणूक करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
– विशाल पाटील, पिडीत तरुण,
शिरुड ता.शहादा.जि.नंदुरबार.