पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण, समाजकल्याण, उत्पादन शुल्क या विभागात लिपीक म्हणून नोकरी देण्याच्या अमिषाने सहा तरुणांना 11 लाख 60 हजार रुपयांचा गंडा आरोपीने घातला आहे. रविंद्र विक्रम जाधव (वय 45, रा. बीड) असे त्याचे नाव असून तो फरारी झाला आहे. या प्रकरणी संजय लोखंडे (वय 46 रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी फाटा येथे स्पर्धा परिक्षांचे अभ्यास वर्ग जाधव चालवत आहे. फिर्यादी लोखंडे हे जाधव याच्या सोबत वर्ग चालवण्याचे काम करतात. जाधवने वर्गातील मुलांना राज्य शासनाच्या विविध खात्यात लिपीक म्हणून नोकरी लावतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. नंतर त्यांच्याकडून ऑगस्ट 2017 मध्ये 11 लाख 60 हजार रुपये घेतले. मात्र त्या दिवसापासून तो बेपत्ता झाला आहे.
याप्रकरणी खासगी क्लासची बदनामी करुन, क्लासच्या नावाने विद्यार्थ्यांची नोकरीच्या आमिशाने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार लोखंडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात केली आहे. याचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.
Next Post