पिंपरी-चिंचवड : संकेतस्थळावर हॉटेलमध्ये नोकरीची जाहिरात देऊन दोन उच्च शिक्षित तरुणांची एका सराईत गुन्हेगाराने 60 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी उघडकीस आली. दिपेश सोनी (रा. पिंपरी) असे फसवणूक करणार्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर भोसरीसह चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या आरोपी सोनी हा चतुःश्रृंगी पोलिसांच्या कोठडीत आहे. याप्रकरणी नदिन गंवडी (वय-25, रा. कर्वेनगर) याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार दि. 6 ते 26 सप्टेंबर 2017 या कालावधीत घडला.
60 हजारास गंडा
फौजदार आर. बी. सोडनवर यांनी दिलेली माहिती अशी, माहिती दिली. फिर्यादी गवंडी हा बीई इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेत आहे. तो व त्याचा मित्र अभिजीत बाबासाहेब पाटील पार्टटाईम नोकरीच्या शोधात होते. लिंक इन या संकेतस्थळावर चिंचवड येथील रिव्हर व्ह्यू हॉटेलमध्ये नोकरी लावण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही जाहिरात पाहून फिर्यादी व त्याच्या मित्राने आरोपी सोनीशी संपर्क साधला. नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सोनीने दोघांकडून प्रत्येकी 30 हजार असे 60 हजार रुपये घेतले. नोकरी न लावताच त्यांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.