नोकरीच्या आमिषाने लष्करातील सेवानिवृत्त कर्मचार्‍याला गंडा

भुसावळ : नोकरी देण्याच्या आमिषाने लष्करातील सेवानिवृत्त कर्मचार्‍याला 42 हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. लष्करातील सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर लक्ष्मण डोळे (61, रा.देनानगर, भुसावळ) यांनी सोलापूर, जळगाव, पुणे याठिकाणी एअरपोर्टमध्ये सुपर वायझरसाठी जागा पाहिजेत असल्याची जाहिरात पाहिल्यानंतर त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. डोळे यांनी सेवानिवृत्त असल्याचे सांगून नोकरीची संधी मिळेल का? अशी विचारणा केल्यानंतर संबंधितानी 65 वर्षापर्यंत आपल्याला एअरपोर्टवर सेवा करण्याची संधी मिळेल, असे सांगून विश्‍वास संपादन केला. यावेळी डोळे यांच्याशी पायल चव्हाण या तरुणीने पॅन कार्ड, आधारकार्ड, बँक खाते पासबुक व्हॉटसअ‍ॅप करायला सांगून युनिफार्म, बुट, अँड्राईड मोबाईलसाठी 20 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2020 पर्यंत एकूण सात वेळा 41 हजार 700 इतकी रक्कम उकळली मात्र संबंधित साहित्याचे पार्सल न आल्याने डोळे यांनी विचारणा केल्यानंतर घरकरच घरपोच मिळेल, असे सांगण्यात आले मात्र फसवणूक जाहिरातदाराचे मोबाईल स्वीच ऑफ झाल्याने फसवणूक झाल्याची खात्री होताच डोळे यांनी 25 जून रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. तपास बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक कृष्णा भोये करीत आहेत.