रेनॉल्ड कंपनीच्या शोरुममधील प्रकार ः मुलाखतीदरम्यान केली होती अनैतिक संबंधांची मागणी
जळगाव– कंपनीत पुढे जायचे असेल तर बॉसला खुश करावे लागेल, असे सांगुन मुलाखतीसाठी आलेल्या दोन तरुणींना अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी करणार्या एमआयडीसीतील रेनॉल्ड कंपनी शोरुमच्या आतिष अशोकराव कोलारकर वय 34 रा. नाशिक यास जिल्हा न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व 2500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायालयातील न्या. श्रीमती मंजुषा नेमाडे यांनी सोमवारी हा निकाल दिला.
एैश्वर्या रॉय एका करोडपतीला नेहमी खुश करायची…
जळगाव शहरातील तरुणी तसेच पारोळा येथील तरुणी या दोघी नोकरीच्या शोधात होत्या. दोघांना एमआयडीसी परिसरातील रेनॉल्ड कंपनीच्या शोरुममध्ये मुलाखती झाल्या. यात जळगावातील तरुणीला मुलाखतीदरम्यान मुलाखतीदरम्यान तात्पुरत्या नियुक्तीवर व्यवस्थापक असलेल्या अशोक कोलारकर याने तरुणीला कंपनीत पुढे जायचे असेल प्रथम बॉसला इंप्रेस करावे लागते असे सांगत एैश्वर्या रॉय या सिने अभिनेत्रीचे उदाहरण दिले. एैश्वर्या रॉय एका करोडपतीला नेहमी खुश करायची, त्यामुळे ती फेमस झाली तुला देखील तुझ्या बॉससोबत पर्सनल रिलेशन ठेवायला लागतील, असे कोलारकर याने सांगितले. मोबाईलनंबर देवून प्रत्येक महिन्याला 25 हजार रुपये तुझ्या खात्यावर जमा करतो, परंत तुला त्या आधी आपल्या अगोदर कुठेतरही भेटायला लागेल असे म्हणत तरुणीचा जबरदस्तीने उजवा पकडून शेकहॅन्ड केला व हातावर चुंबन घेत विनयभंग केला. प्रकार घरी न सांगता तरुणीने थेट सामाजिक कार्यकर्त्या वैशाली विसपुते यांना प्रकार कळविला. विसपुते यांनी कंपनीत जावून कोलारकर याची भेट घेतली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. पारोळा येथील तरुणीसोबतही प्रकार घडल्याचे कळाल्यावर विसपुते यांच्यासह दोघांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कोलारकर यांच्या विरोधात 45 नोव्हेंबर 2014 रोजी गुन्हा दाखल झाला होता.
दंडाच्या रकमेतून पिडीतांना भरपाईचे आदेश
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.टी.धारबळे यांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्या. मंजुळा नेमाडे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात सरकारपक्षातर्फे पिडीत दोघी तरुणी, फिर्यादीची मैत्रिण, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली विसुपुते, पंच गोकूळ धोंडू सोनार, तपासअधिकारी आर.टी.धारबळे, कंपनीचे व्यवस्थापक मनिष खैरनार यांची साक्ष नोंदविण्यात आली. पुरावे, साक्षीदाराच्या साक्षी ग्राह्य धरत न्या. नेमाडे यांनी आरोपी अशोक कोलारकर यास भादंवि कलम 354 अ नुसार 1 वर्ष सक्त मजुरी व 2500 रुपये दंड, दंड न भरल्यास 10 दिवसांची साधी कैद, कलम 354 नुसार 6 महिने सक्तमजुरी व 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 7 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तसेच दंडाची एकूण रक्कम 4 हजार 500 रुपयांपैकी 1500 रुपये फिर्यादी तसेच पिडीत अशा दोघांना देण्याचे आदेशित केले. सरकारपक्षातर्फे अॅड. रंजना पाटील यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून मुशीर तडवी यांनी सहकार्य केले.