नंदुरबार । आरोग्यसेवक विभागात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून दोन लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भीमराव अहिरे (रा. नंदुरबार), भीमराव गवळे (रा. धुळे) व संजय पटेल (रा. नाशिक) या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. योगेश कृष्णा बाविस्कर (रा. लहान माळीवाडा) यांनी तीन लाख रुपये दिले.
मात्र, त्यांना केवळ 40 हजार रुपये परत करण्यात आले. एक लाख 60 हजारांचा धनादेश बाऊन्स झाला. अखेर बाविस्कर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर करीत आहे.