मुरुड-जंजिरा । ८ नोव्हेंबर २०१६ पासून केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपये च्या नोटा बंद चलनातून बाद केले. केंद्र सरकारच्या ह्या निर्णयाचा काळ हा पत संस्थेसाठी कसोटी पाहणारा ठरला होता, असे प्रतिपादन कोर्लई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, कोर्लई या संस्थेच्या २२ व्या सर्वसाधारण सभेत कोर्लई येथे केले.
यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष फ्रान्सिस डिसोझा, सचिव राजेंद्र म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य तथा संचालिका राजेश्री मिसाळ, पंचायत समितीचे सद्स्य चंद्रकांत मोहिते, सहकार विभागाचे, वाघमारे, मुरुड येथील लघु निबंधक कार्यलयातील अधिकारी ज्ञानेश्वर बांगर, संचालक भगीरथ पाटील, संस्थेचे सल्लागार डॉ.अन्सार चोगले, फ्रान्सिस वेगस, मार्था वेगस, आदेलीन डिसोझा, व्यस्थापक लॉरेन्स वेगस आदी मान्यवर उपस्थित होते.
नोटबंदीच्या काळात सहकारी पतसंस्था याना जुन्या नोटा न स्वीकारण्यासंदर्भात आदेश सहकार विभागाने दिले होते. संस्थेच्या अशाही परिस्थितीत सभासद आणि ठेवीदार यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता, पण त्यांच्या सहकार्याने कठीण काळ यशस्वीपणे पार पाडला. या काळात जुन्या नोटा ह्या बँकेतच जमा करण्याची मुभा असल्याने पतसंस्थेचे चांगले ग्राहक हे बँकेकडे वळले. त्यामुळे त्याचा परिणाम हा पतसंस्थेच्या महत्वाच्या खात्यावर झाला असूनही आपल्या संस्थेने गत वर्षीपेक्षा अधिक नफा प्राप्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने सहकारी पतसंस्थेकरीता लागू केलेल्या आदर्श पोट नियमांत बदल करण्यात आला. त्यानुसार पतसंस्थेच्या सभासदाने किमान रु.१००/- चे एक भाग म्हणजे असे पाच म्हणजे रु.५००/-भरणे आवश्यक आहे. तरी सभासदांनी पतसंस्थेच्या कार्यलयात येऊन पतसंस्थेचे आवश्यक ते भाग धारण करावेत असे आवाहनही यावेळी संस्थेचे अध्यक्ष मार्सेलीन रुझार यांनी केले.
यावेळी काही सभासदांनी सूचना केली की पतसंस्थेचे कार्यक्षेत्र वाढवून घेण्यात यावे तसेच सभासदांचा विमा उतरविताना जे मयत सभासद आहेत त्यांच्या वारसांना नोटीस पाठवून मयत सभासदांचे भाग वारस यांच्या नावावर फिरवून घेण्यास सांगावे जेणेकरून सर्व सभासदांचा विमा उतरविण्यास कोणतीही अडचण येणार नाही. जे मयत सभासद आहेत त्यांचे वारसदार सहकार्य करीत असेल तर उत्तम नाहीतर त्याना वगळून विमा योजनेचा लाभ देण्यात यावा.
संस्थेने या सभेत सभासदांना सहकार चळवळ बाबतीत सहकार विभाग पुणे येथील अधिकारी वाघमारे यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यांत आले. या सभेत संस्थेच्या संचालिका राजश्री मिसाळ यां रायगड जिल्हा परिषद सदस्य म्हणून तर संस्थेचे सभासद चंद्रकांत मोहिते हे मुरुड पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. त्याबद्दल त्यांचा संस्थेच्या माध्यमातून यथोचित सत्कार करण्यात आला.