नोटबंदीत जिव गमावलेल्यांना आर्थिक मदत द्या- योगेश देसले

0

जामनेर । राज्यासंह देशात भाजपाची सत्ता आल्यावर सर्वसामान्यांना नोटबंदी सारख्या जाचक प्रसंगांना सामोरे जावे लागून देशभरात 114 जणांना आपला जिव गमवावा लागला. ज्यांनी नोटबंदीच्या काळात आपला जिव गमावलेल्यांना अजूनपर्यंत या सरकारने दिली नसल्याचा आरोप योगेश देसले यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर केला. जामनेर नगर परीषदेची निवडणूक काही महिन्यांनी होवू घातलेली असून 10 गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जामनेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा 10 रोजी घेण्यांत आला.

कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन
तसेच विलास पाटील म्हणाले की. जे गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे असा उपरोधिक टोला त्यांनी नुकतेच भाजपा गोटात गेलेले राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.शरद पाटील व इतर पदाधिकार्यांना लगावला. या कार्यक्रमास जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, योगेश देसले, कल्पिता पाटील, संजय गरूड, डी.के.पाटील, विजया पाटील आदी जिल्हास्तरीय नेत्यांसह तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, पं.स.सदस्य पुजा भडांगे, छाया पाटील, प्रदीप लोढा, अ‍ॅड. ज्ञानेश्वर बोरसे, माजी उपनगराध्यक्ष जावेद मुल्लाजी नगरसेवक सुनिता नेरकर, रुपेश चिप्पड, मुकुंदा सुरवाडे, प्रा.उत्तम पवार, अनिल बोहरा आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.