नोटबंदी, जीएसटीचे सर्वसामान्यांकडून स्वागत; करबुडव्यांकडून टीका

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हादभाई मोदी यांची दैनिक जनशक्तिला खास मुलाखत
देशात रस्ते, शासकीय योजनासह सर्व क्षेत्रात योग्यरित्या विकास होत असल्याने सरकारला 10 पैकी 10 गुण

जळगाव (जितेंद्र कोतवाल)। देशात महागाई, नोटबंदी, जीएसटीवरुन सरकारवर टीका केली जाते मात्र चार वर्षापुर्वी 120 रुपये किलो दराने मिळणारी दाळ 60 रुपये व 100 रुपये दराचा कांदा 25 रुपयांत मिळत आहे, यामुळे महागाई वाढली आहे का कमी झाली आहे, याचा विचार सर्वसामान्यांनी करावा. नोटबंदी व जीएसटीवर सर्वसामान्य व्यापारी नव्हे तर करबुडवे व काळाबाजार करणारे टीका करत असून संपुर्ण देशाने याचे स्वागत केले आहे. याची प्रचिती विविध राज्यांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशामध्ये दिसून आली, अशा स्पष्ट शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हादभाई मोदी यांनी केंद्र सरकारच्या कामगिरीचे मुल्यमापन दैनिक ‘जनशक्ति’ला दिलेल्या खास मुलाखतीत केले.

ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले प्रल्हादभाई मोदी आज जळगाव दौर्‍यावर होते. यावेळी अजिंठा शासकीय विश्रामगृहात त्यांनी दैनिक ’जनशक्ती’शी दिलखुलास गप्पा मारत केंद्र सरकारच्या कामगिरीचे मुल्यमापन केले. त्यांचे विचार वाचा त्यांच्याच शब्दात…..

प्रश्‍न- गेल्या चार वर्षांमध्ये देशात महागाई वाढली आहे. याचा गरीबांसह मध्यमवर्गीयांना झाला आहे. यावर आपले मत आहे.
उत्तर – सरकार बदलण्यापुर्वी म्हणजे चार वर्षांपुर्वी आपल्या देशात दाळ 120 किलो, कांदा 100 रूपये किलो मात्र सरकार बदलल्यानंतर आज तीच दाळ 60 रूपये किलो आणि कांदा 25 ते 30 रूपये किलोच्या भावात मिळत आहे. तर मला वाटत नाही आज जनसामान्यांवर महागाईचा परिणाम जनसामन्यावर पडला असेल.

प्रश्‍न – नोटबंदी आणि जीएसटीचा उद्योगासह व्यापार क्षेत्रावर काय परिणाम झाला?
उत्तर – नोटबंदी नंतर देशात वेगवेगळ्या राज्यात निवडणूका झाल्यात. भारतीय नारिकांनी नोटबंदी स्विकारली नसती तर ज्या राज्यात भाजपा विजयी झाला नसता. नोटबंदी एक चांगला निर्णय सरकारने घेतला होता. मात्र जे उद्योग व व्यापारी आज संकटाच्या भोवर्‍यात सापडले आहे. त्यांनी आपले व्यवहार योग्यपध्दतीने बँकांकडे केला असता तर आज त्यांना ही अडचण भासली नसती. ज्यांना चलनी नोटा बाजारात फिरविले त्यांना अडचण निर्माण झाली आहे. रोकड बाजारात फिरविणे म्हणजे ’कर’ बचत केला जातो. महसूल विभागात कर चुकविणे ही चुकीची गोष्ट आहे. आज जी नोटबंदीबाबत देशात ओरड सुरू आहे ती रोकड व्यवहार करून कर वाचविणारेच करीत आहे. आज मात्र ही परिस्थिती कायम न राहता आता ती बदलेली आहे.

प्रश्‍न – रेशन व्यवस्थेत काळा बाजार रोखण्यासाठी बायोमॅट्रीक प्रणालीसह अनेक उपाययोजना केल्या याबाबत संघटनेची भुमिका काय आहे?
उत्तर – रेशन व्यवस्थेत काळा बाजार होत असल्याने या विषयावर सरकार कंटाळली होती. रेशन दुकानदार संघटनाही यावर विचार करत होतो. रेशन धान्याचा काळा बाजार होवू नये असे आम्हालाही वाटते. मात्र याबाबत योजना किंवा प्रणाली बदल्याने काही होत नाही, यंत्रणा बदलल्याने परिवर्तन होत नाही. सरकार, हितचिंतक किंवा देशाचे हित पाहणारे यांना सांगू इच्छितो की, आज जी परिस्थिती निर्माण झाला आहे. याचा विचार किंवा आत्ममंथन कुणीच केला नाही की रेशन धान्याशी जुळलेले जनता काळा बाजार करण्यास तयार होतात. आज देशातील कोणाही व्यक्ती देशाच्या विरोधात विचार करणार नाही तरी सुध्दा रेशनचा काळाबाजार रोखण्यासाठी बायोमॅट्री प्रणाली किंवा पॉस मशिन याला आमचा विरोध नाही. शासकीय अधिकारी यांच्यामुळे काळाबाजार वाढत असल्याचे दिसून आले आहे. बायोमॅट्रीक प्रणाली किंवा पॉस मशिन याला आमचा विरोध नाहीच. त्यामुळे रेशन दुकानदार आणि सरकार यांच्यातील विचार आणि मतभेद जमीन आकाशाप्रमाणे झाले आहे. यावर सरकारने चांगला विचार केल्यास सर्व गरजूंच्या खात्यात सबसिडी न देता रेशन दुकानाच्या माध्यमातूनच संपुर्ण देण्यात यावे. याउलट सबसिडी बँकेच्या खात्यात जमा झाल्यास रेशन न घेता संबंधीत व्यक्ती महिलाकडून पैसे घेवून त्या पैश्यातून दारू पिण्यासाठी करून शकतो आणि मग बालकांमधील कुपोषण वाढेल, महिला सबलिकरणावर फरक पडेल. तर दुसरीकडे 5 लाख 27 हजार 229 दुकानदारांच्या परिवारावर बेरोजगारांची कुर्‍हाड कोसळणार नाही.

प्रश्‍न – गैरप्रकार दुर होवून रेशन शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ कसा पोहचविता यईल? यावर आले मत काय
उत्तर – बायोमॅट्रीक प्रणाली किंवा पॉझ मशिनमध्ये ग्राहकाचे थम्ब लावल्याशिवाय कुपन जनरेट झाल्यावर रेशन किंवा धान्य रेशनदुकानदारास धान्य देता येईल. या प्रणालीमुळे काही दुकानदार आणि शासकीय अधिकारी यांची भागीदारी पुर्णपणे थांबली आहे. दोघांमधील काळाबाजार थांबल्याने शासकीय अधिकार्‍यांना ही प्रणाली बंद व्हावी असा हेतू आहे. हेच अधिकारी कागदपत्रांच्या माध्यमातून ही प्रणाली बंद करण्याच्या मार्गावर आहे.

प्रश्‍न – सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण सरकारला 10 गुण पैकी किती गुण देणार?
उत्तर – चार वर्षांपुर्वी सर्वसामान्य माणूस सकाळी उठल्यावर एकच चिंतेत विचार करत होता. मात्र 26 मे 2014 नंतर तोच साधारण माणूस आज आनंदी आहे. कारण देशात विकास कामे, रस्ते, शासकीय योजनासह सर्व क्षेत्रात योग्यरित्या विकास होत आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षाचा आढावा बघितला तर या सरकारला मी 10 पैकी 10 गुण देतो.