जळगाव : नोटाबंदीच्या निर्णयास 50 दिवस पूर्ण होत असले तरीही अद्यापही सुट्टया पैशांची टंचाई कायम आहे. पंतप्रधान मोदी यांनी 50 दिवसांत नोटांची चणचण संपुष्टात येणार असल्याच्या पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांच्या घोषणा हवेतच विसरल्याचे प्रत्यक्षात दिसते आहे. पैशांअभावी बंद असलेले एटीएम सेंटर, रोकड मिळाणार्या एसबीआय, एसबँकच्या एटीएमसमोरील रांगा, बँकांमध्ये रांगत उभे असणारे खातेदार हे चित्र अजूनही कमी जास्त प्रमाणात कायम आहे. दरम्यान, नोटाबंदीनंतर पंतप्रधांनी 50 दिवसांची मागणी केली होती. 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान पुन्हा एखादी नवीन घोषणा करीत का याबाबत चर्चा शहरात रंगली होती.
महानगरपालिकेस फायदा
महानगर पालिका नोटबंदीच्या निर्णयानंतर शासकीय कर भरण्यासाठी जुन्या नोटा स्विकारणाची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार महानगर पालिकेत करांचा भराणा 15 डिसेंबर पर्यंत जुन्या नोटांत स्वीकारण्यात आला. याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत करांची 15 कोटी रुपयांचा भरणा नागरिकांद्वारे करण्यात आली. नोटाबंदीमुळे झालेल्या भरणाने एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान महानगर पालिकेची 30 कोटी रुपयांची वसुली करण्यात मनपा यश आले. नोटबंदीमुळे पालिकेच्या कर्मचार्यांना दारोदारी फिरता बसल्या जागी वसुली मिळू लागली. यंदा डिसेंबर महिन्यात वसुली 40 टक्क्यांवर पोहोचली असून मार्चअखेर हा आकडा 60 टक्क्यांपर्यंत जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
निर्णयाचे अनेकांनी केले स्वागत
नोटाबंदीच्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. त्याची अंमलबजावणी पूर्णपणे अपयशीच ठरली असल्याचे चित्र दिसत असल्याचे काही नागरिकांनी स्पष्ट केले. तर आजही अनेक एसबीआय बँकांच्या मुख्य शाखेपुढे, एटीएमपुढे रोकड घेण्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. त्यातही रांगेतील प्रत्येकाला हवी असलेली रक्कम मिळेल, याची काहीच शाश्वती नाही. बँकांकडे अजून हवी तेवढी कॅश नाही. त्यात एटीएममधूनही बहुतांश वेळा दोन हजार रुपयांची नोट येत असल्याने सुट्ट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक बँकांमध्ये रोकड कमी असल्याने सरकाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षाही कमी रक्कम ग्राहकांच्या हातात पडत होती.
एटीम बंद असल्याने नागरिकांची वणवण
बँकेच्या ग्राहकांना पैशांची गरज लागल्यास त्याला तात्काळ पैसे मिळावेत यासाठी एटीएम मशिनची सुविधा बँकांद्वारे ग्राहकांना देण्यात आली आहे. परंतु, नोटाबंदीनंतर शहरातील ठराविक एटीएम मशिनमध्येंचे पैसे मिळत होते. तर बहुतांश एटीएम मशिन बंद असल्याने बँक खात्यात पैसे असूनही नागरिकांना पैशांची चणचण भासत आहे. सेंट्रल बँकेच्या नवी पेठ शाखेतील एटीएम देखील बंद आहे. तसेच या शाखेत पैसे काढण्यासाठी व पैसे भरण्यासाठी वेगवेगळी खिडकी न ठेवता एकच खिडकी शुक्रवारी ठेवण्यात आली होती. यामुळे या खिडकीवर गर्दी झाली होती. तर स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. शासनाने एटीएममधून दिवसाला अडीच हजार रूपये काढता येतील असे जाहिर केले होते.
कॅशलेसबाबत व्यावसायिकांमध्ये जागृती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत शहरात करण्यात आले. तसेच कॅशलेस व्यवहार कसा करावा याबाबत जनजागृती सामाजिक संस्था, बँका, महाविद्ययांनी विविध उपक्रम राबविले. यात सामाजिक संस्थांनी कॅशलेस व्यवहार कसा करावा याबाबत पथनाट्य, चर्चासत्रांचे आयोजन केले होते. तर महानगर पालिकेत देखील कॅशलेश व्यवहार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. याचाच आदर्श घेत काही व्यवसायिकांनी पेटीएम, डेबीट, क्रेडीट कार्डच्या उपयोग करून आपला व्यवहार सुरू केला आहे. यात महानगर पालिकेजवळ लागणारे अग्रवाल चाट भांडार सारख्या छोट्या व्यवसायिकाने देखील डेबीट, के्रडीट कार्डाद्वारे पेमेंट स्वीकारण्यास सुरूवात केली आहे.
एटीएममधून मिळतात 2000 रु
शहरातील एटीएममधून केवळ दोन हजारांची नोटच मिळत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. यासोबतच शेतकर्यांचे खाती ही सहकारी बँकेत असून सहकारी बँकांमध्ये नवीन चलन पुरवठा उपलब्ध करुन देण्यात आलेला नसल्यामुळे पैशाअभावी अडचणींचा सामना करावा लागत होता. याविरोधात सहकारी बँकचालकांनी आंदोलन देखील केले होते.
बँकेतून पैसे काढण्यासाठी रांगेत दिड दोन तास लागत आहेत. नोटाबंदीच्या 50 दिवसानंतर देखील बँकामधील गर्दी कमी झालेले नाही. बँकांमधील गर्दी कमी होत नसली तरी मोदी सरकाने घेतलेली निर्णय हा चांगला आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे. याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी असे धाडसी पावूल उचलेले नव्हते. -पंकज साळुंखे, नागरिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय चांगला आहे. नोटाबंदींच्या निर्णयाने हॉटेल व्यवसायिक परिणाम झाला आहे. प्रत्येक वर्षी थर्टी फस्ट मनविण्यासाठी नागरिक अॅडव्हांस बुकींग करीत होती. परंतु, नोटाबंदींच्या निर्णयामुळे यावर्षी अॅडव्हास बुकींग करणार्यांची संख्या रोडावलेली आहे. -संदीप सपकाळे, हॉटेल व्यवसायिक
नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करतांना काळजी घ्यायला हवी होती. नागरिकांना या निर्णयामुळे शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासानंतर देखील मोदींच्या निर्णयांमुळे अच्छे दिवस लवकरच येतील असे
दिसत आहे. – आकाश दुबे, विद्यार्थी