नवी दिल्ली । नोव्हेंबर महिन्यातील नोटाबंदीनंतर चलनातून बाद करण्यात आलेल्या 99 टक्के जुन्या नोटा बँकामध्ये परत आल्याचा दावा रिझर्व्ह बँकेने केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून याबाबत सुरू असणार्या चर्चेला पूर्णविराम देत नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच किती पैसा जमा झाला, याची आकडेवारी रिझर्व्ह बँकेने बुधवारी अधिकृत माहिती जारी केली. यात हा दावा करण्यात आला आहे.
नोटाछपाईचा खर्च वाढला
नोटाबंदीपूर्वी चलनात असलेल्या 15.44 लाख कोटी रुपयांपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले. तर एक हजार रुपयांच्या नोटेमध्ये केवळ 8 हजार 900 कोटी रुपये म्हणजे 8.9 कोटी नोटा बँकेत परतल्या नाही, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. दरम्यान नोटा छपाईचा खर्चही या आर्थिक वर्षात दुप्पट झाल्याची माहिती आरबीआयने दिली. 2016-17 या वर्षात नोटा छपाईचा खर्च 7 हजार 965 कोटी रुपये झाला आहे, जो 2015-16 या वर्षात 3 हजार 421 कोटी रुपये एवढा होता.
छोट्या नोटांचा वापर वाढला
31 मार्च रोजी देशात 500 रुपयांचे एकूण 2.9 लाख कोटी रुपये मुल्यांचे चलन, यात 100 रुपयांचे 2.5 लाख कोटी रुपये चलनात आले. जे 60 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर 50 रुपयांचे 31 मार्चपर्यंत एकूण 35,600 कोटी रुपये मुल्यांचे चलन, जे 84 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. याशिवाय 20 रुपयांचे 31 मार्चपर्यंत 20,300 कोटी रुपये चलनात आले, हा वाटा 107 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यामुळे चलनातील छोट्या नोटांचा वापर वाढला.