‘नोटाबंदी इतिहासातला फसलेला सर्वात मोठा प्रयोग‘

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तडकाफडकी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा फसलेला प्रयोग होता, अशी टीका अमेरिकेतील एका मॅगझिनने केली आहे. या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्था सर्वात मोठे नुकसान सहन करत आहे, असाही उल्लेख या मॅगझिनमध्ये करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर 500 आणि 1 हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आला. या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला खिळ बसली आहे. तसेच आजवरचे सगळ्यात मोठे नुकसान या एका निर्णयामुळे झाले आहे, असेही या अंकात म्हटले आहे.

क्रेबट्री हे सिंगापूरच्या के ली कुआन यू स्कूलचे वरिष्ठ रिसर्च फेलो आहेत. फॉरेन अफेअर्स या मॅगझिनने आपल्या ताज्या अंकात, लेखक जेम्स क्रेबट्री यांच्या हवाल्याने नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतीय जनता निराश झाली आहे. आता 2019 ला होणार्‍या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मोदींनी आपल्या नोटाबंदीच्या निर्णयातून ठोस धडा घेतला पाहिजे, असेही या क्रेबट्री यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.

500 आणि 1 हजार रूपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि एटीएम मधून पैसे काढण्यासाठी नोटाबंदीच्या काळात लोकांना सर्वाधिक काळ रांगेत उभे रहावे लागले. यामुळे देशातल्या गरीब जनतेला सगळ्यात जास्त हाल सहन करावे लागले. भारतीय नगदी व्यापारातली अर्थव्यवस्था ठप्प झाली, असेही या लेखात नमूद करण्यात आले.