नोटाबंदी विरोधातील विरोधकांचा आकांडतांडव निष्फळ

0

प्रदिप चव्हाण

जळगाव । सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला विरोधक विविध मुद्यावरुन धारेवर धरण्याचे प्रयत्न करत असल्याचे अनेक घडामोडीतून दिसुन आले आहे. त्यातच पंतप्रधान नरेद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी चलनातील पाचशे व एक हजार रुपयाच्या नोटा चलनातुन रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा मुद्दा तर विरोधी पक्षाला विरोधा करण्यासाठी आयती चालुन आलेली संधीच होती. नोटाबंदीच्या निर्णयाचा जवळपास सर्वच राजकीय पक्षाने विरोध केला. एैन नोटाबंदीच्या काळातील नगरपालिका निवडणूक व त्यानंतर घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद निवडणूकी भाजपाने अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळविली असल्याने जनतेला नोटाबंदीचा निर्णय मान्य असल्याचे दिसुन आले आहे. सर्वच विरोधी राजकीय पक्षाच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी नोटाबंदीचा मुद्दा असल्याने विरोधाकांनी नोटाबंदी विरोधी मुद्दा जनतेपर्यत पोहचविण्याचा प्रयत्न केला. परंतु जनतेने भाजपाला पसंती दिल्याने विरोधक तोंडघशी पडले असून त्यांचा आकांडतांडव निष्फळ ठरला आहे.

राज्यातील चारही निवडुक भाजपाने जिंकली
नोटाबंदीच्या निर्णयाला जनता कंटाळली असून जनता सत्ताधारी पक्षाला जागा दाखविण्यासाठी वेळ शोधत असल्याची चर्चा जवळपास नोटाबंदीच्या काळात सुरु होती. नोटाबंदीनंतर राज्यात चार महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्या. एैन नोटाबंदीच्या काळात महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुक झाली. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था व पदविधर मतदारसंघाअंतर्गत अशी दोन विधान परिषद निवडणुक व नुकतीच जिल्हा परिषद निवडणुक घेण्यात आली. या चारही निवडणुकीत भाजपाला धक्का बसेल अशी चर्चा असतांना चारही निवडणुकीत पक्षाने घवघवीत यश संपादन केले. असुन विरोधकांना अनपेक्षीत धक्का दिला

भाजपाचा विजयाचा ‘वारु’ निरंतर सुरु
गेल्या 60 वर्षापासुन देशात कॉग्रेसची सत्ता होती. कॉग्रेस सत्तेच्या काळात अनेक घोटाळे उघड झाल्याने जनता प्रचंड नाराज झाली. कॉग्रेस सरकारला वाट दाखविण्यासाठी जनतेला पर्यायी पक्ष हवा होता. पर्यायी पक्ष म्हणून जनतेने 2014 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत दिले. तेव्हा पासुन भाजपाचा विजयी रथ सुरु झाला. महाराष्ट्रासह इतर राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजय रथ निरंतर सुरु होता. या विजयी रथ दिल्ली, पश्‍चिम बंगाल आणि बिहारच्या निवडणुकीत रोखला गेल्याचा दिसुन आले. मात्र महाराष्ट्रातील नगरपालिका, जिल्हा परिषद ,महानगर पालिकेची निवडणुक झाली त्यात भाजपाने निर्विवाद यश संपादन केल्याने भाजपाचा विजयाचा वारु निरंतर सुरु असल्याचे पुन्हा दिसुन आले.

भाजप मताची टक्केवारी वाढली
राज्यातील 25 जिल्हा परिषद, 10 मनपांसह 283 पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले. बहुतांश सर्वच मनपांसह झेडपीत भाजपने आघाडी घेत पुन्हा क्रमांक 1 चा पक्ष म्हणून स्थान कायम ठेवले आहे. निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत भाजपाची मताची टक्केवारी वाढली असून शहरी भागासह ग्रामीण भागातील भाजपाचे मतदार वाठले आहे. जळगाव जिल्हा परिषदेत भाजपाने मागील पंचवार्षिक निवडणूकीपेक्षा अधिक जागा मिळविल्या आहेत. सद्या जिल्हा परिषदेत भाजपाचे 23 सदस्य होते या निवडणुकीत 67 पैकी 33 जागांवर विजय मिळविला आहे. बहुमतासाठी भाजपाला केवळ एका जागेची आवश्यकता आहे.