नोटाबंदी.. 25 लाखांहून जास्त रक्कम जमा करणार्‍यांना नोटिसा

0

नवी दिल्ली । नोटाबंदीनंतर बँक खात्यांमध्ये 25 लाखांहून अधिक रक्कम जमा करणार्‍या 1 लाख 16 हजार लोकांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. 25 लाखांहून अधिक रक्कम जमा करुन त्यानंतर आयकर न भरल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. याशिवाय, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बँकेत जमा करुन आयकर भरणारेही आयकर विभागाच्या रडारवर आहेत.

आयकर भरणारेही कायद्याच्या कचाट्यात
‘नोटाबंदीनंतर 25 लाखांहून अधिक रक्कम बँक खात्यात जमा करणार्‍या लोकांची संख्या 18 लाख इतकी होती. या 18 लाखांचे वर्गीकरण दोन गटांमध्ये करण्यात आले आहे. 25 लाखांहून अधिक रक्कम जमा करणारे आणि 10 ते 15 लाख रुपये जमा करणारे, असे दोन गट तयार करण्यात आले आहेत,’ अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी दिली.

आयकर भरण्यासाठी नोटीस
‘25 लाखांहून अधिकची रक्कम बँकेत बँका भरणार्‍या 1 लाख 16 हजार लोकांनी अद्याप आयकर भरलेला नाही. त्यांना पुढील 30 दिवसांमध्ये आयकर भरण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.

नोटाबंदीनंतर 609 गुन्हे
1 आयकर कायद्यांतर्गत दाखल होणार्‍या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत आयकर कायद्याखाली 288 गुन्हे दाखल झाले होते. यंदा आकडा 609 वर जाऊन पोहोचला.
2 यंदाच्या वर्षात आयकर विभागाकडे एकूण 1046 तक्रारी आल्या होत्या. गेल्या वर्षी हे प्रमाण 652 इतके होते. आयकर कायद्यांतर्गत दोषी ठरणार्‍यांची संख्यादेखील यंदा वाढली आहे.