नवी दिल्ली : गुजरातमध्ये 8 ऑगस्टरोजी राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होत असून, या निवडणुकीत नकाराधिकार (नोटा)चा पर्याय मतदारांना वापरण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी काँग्रेसने न्यायालयाकडे केली होती, ती न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांना नोटाचा पर्याय उपलब्ध असेल.
त्रुटी आत्ताच कशा दिसल्या?
सरकारने नोटाला स्थगिती दिली नाही तर आमदारांची मते दुसरे पक्ष खरेदी करतील. यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव होईल, अशी बाजू काँग्रेसने न्यायालयात मांडली होती. न्यायालयाने म्हटले की, निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीत नोटाचा वापर करण्याबाबतची अधिसूचना 2014 मध्येच जारी केली होती. मग काँग्रेसला यातील त्रुटी आत्ताच कशा दिसून आल्या? हा एक संवैधानिक मुद्दा आहे. यावर चर्चेची गरज आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र, राज्यसभा निवडणूक त्याआधीच होणार असल्याने या निवडणुकीत नोटाचा वापर होणार हे निश्चित आहे.