नोटीस मिळताच दिवाकर रावते माघारी

0

कोल्हापूर – बेळगावमधील मराठी भाषकांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेले दिवाकर रावते माघारी परतले आहेत. बेळगाव पोलिसांनी ठाम राहत नोटीस दिल्याने रावते परत फिरल्याचे सांगण्यात येत आहे.

स्वत:ला वाघ म्हणवून घेणार्‍या शिवसेनेच्या भुमीकेविषयी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकत्यांमधून संताप व्यक्त होेत आहे. कागलमधील कोगनोळी फाट्याजवळ कर्नाटक पोलिसांकडून रावते यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्यात आला. यावेळी पोलिसांकडून दिवाकर रावते आणि संजय पवार यांना कन्नड भाषेतील जिल्हाबंदीच्या नोटीस देण्यात आल्या. आता पोलिसांनी ठाम भूमिका घेतल्याने दिवाकर रावते यांना पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने परतावं लागलं.