जळगाव-महापालिका मालकीच्या मूदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना कलम 81 क नुसार नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यासाठी त्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र, अद्याप गाळेधारकांनी भरणा केला नसल्याने एकीकडे प्रशासनाकडून गाळे जप्तीसाठी नियोजन केले आहे.तर दुसरीकडे आज दोन गाळेधारकांनी महापालिकेत 20 लाख रुपयांच्या थकीत भाड्याचा भरणा केला आहे.
मनपाच्या मालकीच्या 18 मार्केटमधील 2387 गाळेधारकांची कराराची मूदत 2012 मध्ये संपली आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील गाळे कारवाईबाबत आदेश दिले आहेत. मात्र, गाळेधारकांन्वर मनपाने लावण्यात आलेले भाड्याचे दर हे अवास्तव असल्याने गाळेधारकांकडून भाडे भरण्यास नकार दिला जात होता. गाळ्यांचे पुर्नमुल्यांकन करुन नव्याने बीले वाटप करण्यात आली. त्यानुसार फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांकडील थकीत रक्कम तब्बल 88 कोटी रुपयांनी कमी करण्यात आली. तसेच नव्याने देण्यात आलेल्या भाड्याची बीलांनुसार ही रक्कम भरण्यासाठी मनपाने 15 दिवसांची मूदत दिली होती. मात्र, एकाही गाळेधारकाने रक्कम न भरल्याने आता मनपाकडून कारवाईची जोरदार तयारी केली आहे. जप्तीची कारवाई सुरु होणार असतांनात दोन गाळेधारकांनी थकीत रकमेचा सोमवारी भरणा केला आहे. तसेच आणखीही काही गाळेधारक भरणा करण्याची शक्यता आहे.
Prev Post
Next Post