नोबेल पुरस्कारावर कोरोनाचे संकट; ६४ वर्षात पहिल्यांदाच सोहळा रद्द

0

नवी दिल्ली: जगभरात सध्या कोरोनाचे सावट आहे. संपूर्ण जगाचे नियोजन कोरोनामुळे ढासळले आहे. यातच यावर्षी पार पडणारा नोबेल पुरस्कार सोहळाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ६४ वर्षांत पहिल्यांदाच हा सोहळा रद्द करण्याची वेळ आली आहे. नोबेल पुरस्कारांचे आयोजन करणाऱ्या संस्थेनं यासंदर्भातील माहिती दिली आहे. पुरस्कार सोहळ्य कशा प्रकारे घ्यायचा? हे काही दिवसात स्पष्ट केले जाणार आहे.

ज्या प्रकारे नोबेल आठवडा आयोजित करण्यात येतो तसा यावेळी करण्यात येणार नाही. त्यामुळे यावर्षीचा नोबेल पुरस्कार सोहळा रद्द केला जाणार असून तो नव्या स्वरूपात दिसेल, अशी माहिती नोबेल फाऊंडेशनचे संचालक लार्स हेकेन्स्टीन निवेदनाद्वारे दिली.

दरवर्षी या कालावधीत त्या वर्षातील नोबेल पुरस्कार विजेत्यांना स्टॉकहोममध्ये आमंत्रित केले जाते.