शहादा। सकाळी 11 वाजेपासुन एकमार्गी वाहतूक (नो एन्ट्री) बाबत पोलिस प्रशासनाने वाहनबाबत कारवाईची धडक मोहीम सुरू केल्याने नो एंट्री मध्ये प्रवेश करणार्या वाहनावधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. काही वाहनधारकांनी पोलिसांना चकमा देउन पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. दुपारी 2 वाजेपर्यंत 40 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली होती. पोलीस उपअधिक्षक महारु पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक शिंदे , निलीमा सातव सहवाहतुक शाखेच्या पोलीसकर्मचार्यांनी ही कारवाई केली.
कारवाईत सातत्याची मागणी
महात्मा गांधी पुतळा, जनता चौक, चार रस्ता, डायमंड कोरनर, तहसील कचेरी समोरील पोलिसांनी नो एंट्री मध्ये प्रवेश करणार्या वाहनधारकांना पकडले. यात मोटरसायकल, रिक्षा, कार या वाहनांच्या समावेश होता. रस्त्यावर बराच काळ वाहनांची वर्दळ कमी झाली होती. शहरात वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा मोहीम राबविण्यात येइल अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजीराव बुधवंत यांनी दिली. ही मोहीम तात्पुरती न राबवता सातत्याने राबवावी अशी मागणी नागरिकांची आहे. डायमंड कॉर्नर महात्मा गांधी पुतळा चार रस्ता या ठिकाणी एकेरी मार्गाचे फलक लावले आहेत. त्याच्या काहीही उपयोग होत नाही. वाहनधारक सातत्याने नियमांचे उल्लंघन करतात. डायमंड कॉर्नर जवळ नो एंट्रीमुळे भयानक परिस्थिती आहे.