नौकरीचे आमिष दाखवून फसवुक करणार्‍यास अटक

0
जळगाव : लंडन देशातील हॉटेल जॉर्ज येथे नौकरीचे आमिष दाखवून 26 लाख 83 हजार रुपयांची फसवुक केल्याप्रकरणी 2014 मध्ये जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलीसांनी एकाला सुरत येथून अटक केली आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
प्रियंका सिंग व जेम्स मार्क यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी कासोदा येथील सुभाष नगर भागातील धर्मराज रघुनाथ जाधव व विश्‍वास तायडे यांना त्यांच्या मुलांना लंडन देशातील जॉर्ज हॉटेल येथे वेटर, रुम अटेन्डस या पदावर नौकरीला लावून देण्याचे आमिष दाखविली होते. त्यानंतर धर्मराज जाधव यांनी आयसीआयसी बँकेत 10 लाख 79 हजार 600 रुपये तर विश्‍वास तायडे यांनी 16 लाख 3 हजार 456 रुपये असे एकूण 26 लाख 83 हजार 56 रुपये  प्रियंकासिंग व जेम्स मार्क यांच्या खात्यात भरले. मात्र, त्यांनी धर्मराज जाधव व विश्‍वास तायडे यांनी काम न करता फसवणुक केली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात 23 डिसेंबर 2014 रोजी 15 ते 16 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसांनी 2015 मध्ये कुणाल बिपिनचंद्र उज्जैनी, प्रतिकभाई जितेंद्रभाई भिमानी, दिनेश कुमार किशलाल प्रजापत, नरेंद्रकुमार बछराज माथुर, सतिष पुनितराम शर्मा या पाच संशयितांना अटक केली होती तर इतर फरार होते.
फेसबुकवरून लोकेशन टॅ्रक; सुरत येथून अटक
फसवणुक प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोनि. कुबेर चवरे यांनी मागील गुन्ह्यांचा पाठपुरावा घेत एपीआय गजानन राठोड, जनार्दन चौधरी, महेंद्र बागुल शेखर चौधरी अशांचे पथक तयार करून संशयितांच्या शोधार्थ पाठविले होते. पथकाला संशयित अरूनेंद्र कौशलप्रसाद पटेल याची माहिती मिळाली. पथकाने इंदोर, भोपाळ येथे संशयिताचा शोध घेतला परंतू तो मिळून आला नाही. यानंतर गुप्त बातमीदारमार्फ त्याचा मोबाईल क्रंमाक मिळवला. त्यानंतर पथकाने त्याचे फेसबुक अकाऊंट तपासले असता त्याने सुरत येथे असल्याची माहिती टाकली होती. त्यानंतर फेसबुक लोकेशन टॅ्रक करून पोलीसांनी सुरत गाठले. यातच तो सुरत येथील एल अ‍ॅण्ड टी कंपनीत कामाला असतांना त्याला पथकाने पकडले. शुक्रवारी त्याला सायंकाळी अटक करून त्यास जळगावात आणले. यानंतर अरुनेंद्र कौशलप्रसाद पटेल याला न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावली.
पाच संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात
धर्मराज जाधव यांनी आयसीआयसी बँकेत 10 लाख 79 हजार 600 रुपये तर विश्‍वास तायडे यांनी 16 लाख 3 हजार 456 रुपये असे एकूण 26 लाख 83 हजार 56 रुपये प्रियंकासिंग व जेम्स मार्क यांच्या खात्यात भरले. मात्र, त्यांनी धर्मराज जाधव व विश्‍वास तायडे यांनी काम न करता फसवणुक केली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात 23 डिसेंबर 2014 रोजी 15 ते 16 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसांनी 2015 मध्ये कुणाल बिपिनचंद्र उज्जैनी, प्रतिकभाई जितेंद्रभाई भिमानी, दिनेश कुमार किशलाल प्रजापत, नरेंद्रकुमार बछराज माथुर, सतिष पुनितराम शर्मा या पाच संशयितांना अटक केली होती तर इतर फरार होते.