न्यायदेवतेला मुकी बहिरी करण्याचा प्रयत्न!

0

उद्धव ठाकरे यांचा सरकारवर निशाणा

मुंबई : या देशात न्यायदेवतेला कुणी तरी मुकी बहिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. या देशाचे लोक सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावे. ज्यांच्याकडे सत्ता सोपवली आहे, ते आपली जबाबदारी नीट पार पाडत आहेत की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर नाव न घेता निशाणा साधला. शिवसेना भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उद्धव यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली.फक्त निवडणुका जिंकणे म्हणजे कारभार करणे असे होत नाही. न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळॆ आता न्याव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा की नाही, असा प्रश्न लोकांना पडला आहे, असे उद्धव म्हणाले. न्यायव्यवस्थेला त्यांचे काम करू द्यावे,अशी भूमिका उद्धव यांनी मांडली. न्यायाधीश लोया यांच्या वादग्रस्त मृत्यू प्रकरणात चौकशी झाली पाहिजे. कर नाही त्याला डर कशाला, असे मत उद्धव यांनी व्यक्त केले.

न्यायव्यवस्थेला काम करू द्या
न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेणे धक्कादायक होते तरीही या चारही न्यायाधीशांचे कौतूक झाले पाहिजे. मुळात त्यांच्या तक्रारींकडे गाभीर्याने लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या तक्रारींच्या खोलात जायला हवे आणि कोणत्याही परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप न करता तसेच या विषयाचे राजकरण न करता. या तक्रारींचा निवाडा व्हायला हवा, असं त्यांनी सांगितलं. आता न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा की नाही हा लोकांना प्रश्न पडलाय असं सांगतानाच सरकारने न्यायव्यवस्थेला त्यांचे काम करू द्याव, असे आवाहनही त्यांनी केले.