नवी दिल्ली: आयएनक्स मिडीया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सद्ध्या अटकेत असेलेले माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी जमीन मिळण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दिला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन याचिका फेटाळली होती. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका पी.चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीस बजावली आहे.
या प्रकरणी पुढील सुनावणी 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून पी. चिदंबरम यांना अंमलबजावणी संचालनालय यांच्या अटकेत असून, आयएनक्स मिडीया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी सुरु आहे. चौकशी दरम्यान चिदंबरम यांची बेनामी संपत्तीचा खुलासा करण्यात आला आहे. ईडी राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे.