धुळे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गापासून 500 मिटरच्या अंतरातील सर्व दारू दुकाने, बिअरबार, वॉईन शॉपचे परवाने रद्द करण्यात आल्याने धुळे जिल्ह्यातील तब्बल 260 दुकाने बंद झाले होते. मात्र शासनाच्या नव्या सुधारीत परिपत्रकामुळे मद्यविक्रेत्यांंना आणि पर्यायाने तळीरामांनाही काहीसा प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यानुसार 500 मिटरपर्यंत बंदीची अट आता 220 मिटर पर्यंत घटवण्यात आली आहे. त्यामुळे धुळे शहरासह जिल्ह्यात एकुण 11 बिअरबार वॉईन शॉप दुकानदारांना दिलासा मिळाला आहे.
नव्या परिपत्रकामुळे मद्यप्रेमी खूश
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त पी.एच.पवार यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेले परिपत्रक धुळे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात प्राप्त झाले आहे. नव्या परिपत्रकानुसार महामार्गापासून 500 मिटरपर्यंत क्षेत्रातील मद्यविक्री करणार्यांचे परवाने नुतनीकरण न करण्याच्या अदेशात सुधारणा करीत हे अंतर 220 मिटर करण्यात आले आहे. या परिपत्रकामुळे धुळे जिल्ह्यातील 11 मद्यविक्री परवानेधारकांना लाभ मिळणार आहे. शहरासह जिल्ह्यात मद्यविक्री बंदीच्या निर्णयाचा फटका तब्बल 260 परवानाधारकांना बसला होता. त्यामुळे सर्वच दुकान बंद झाली होती. दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 1 एप्रिल रोजी सिल केल होती. परंतु जिल्हाभरात फक्त 4 दुकानांनाच परवानगी देण्यात आली होती आणि जिल्ह्यात 62 दुकानांना दिलासा मिळाला होता आणि आता नव्याने झालेल्या परिपत्रकामुळे 11 मद्यविक्रीची दुकाने सुरू होऊ शकतील. यामुळे मद्यप्रेमी काहीअंशी खूश झाले आहेत.