जळगाव –येथील जिल्हा न्यायालयात सुनावणीसाठी आणलेल्या दंगलीतील संशयित समीर नजीर रंगरेज रा.गेंदालाल मील याने सोमवारी दुपारच्या सुमारास पळ काढला होता. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, गणेश शिरसाळे, प्रणेश ठाकूर, गणेश पाटील यांनी रात्री संशयिताचा शोध घेवून समीर रंगरेज याला ताब्यात घेतले.