मुंबई- उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बहुचर्चित सिंचन घोटाळ्याची सुनावणी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. त्याचबरोबर न्यायालयाने या घोटाळ्याच्या तपासाचा प्रगती अहवालही राज्य सरकारला मागितला आहे. संबंधित न्यायालयात या प्रकरणी दाखल झालेल्या खटल्यांवर तातडीने सुनावणी घेण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत.
यापूर्वी गत महिन्यातील सुनावणी वेळी न्यायालयाने विदर्भातील सिंचन घोटाळ्यांसंदर्भात दाखल आरोपपत्रांवर विशेष न्यायालयात ३ महिन्यांत सुनावणी पूर्ण करावी, त्यासाठी दैनंदिन सुनावणी घ्यावी, अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी एसीबीच्या प्रलंबित प्रस्तावांवर राज्य शासनाने आठवडाभरात निर्णय घ्यावा, असे स्पष्ट आदेश दिले होते. तसेच विशेष तपास पथकांच्या तपासातील मंदगतीवर तीव्र नापसंती व्यक्त केली होती.