मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बीएस-111 इंजिन असलेल्या गाड्यांवर वाहन कंपन्यांनी घसघशीत सूट दिल्यामुळे या वाहनांच्या खरेदी-विक्रीत मागील दोन दिवसांत प्रचंड वाढ झाली. 30 मार्च रोजी तब्बल 13, 757 नव्या गाड्यांची नोंदणी झाली. ही 3 पट वाढ होती, तर 31 मार्च 2017 रोजी दुपारपर्यंत तब्बल 15,211 गाड्यांची नोंदणी झाली. मात्र, अनेक शोरूम काल रात्री 12 पर्यंत सुरू होते. त्यामुळे हा आकडा 25 ते 30 हजारांपर्यंत गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, वाहनांवरील बंपर ऑफरनंतर राज्यातील प्रत्येक ठिकाणी शोरूममध्ये बरीच गर्दी दिसत होती. अनेक शोरुममध्ये तर ‘आऊट ऑफ स्टॉक’ अशा पाट्याही लावण्यात आल्या होत्या. गेल्या दोन दिवसांत गाड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. मुंबईत 30 मार्चला 212 चारचाकी आणि 596 दुचाकींची नोंदणी झाली, तर 31 मार्चला 110 चारचाकी आणि 646 दुचाकींची नोंदणी झाली, तर पुणे, बुलडाणा, औरंगाबाद, मालेगाव, उस्मानाबाद, सोलापूर, वसई या ठिकाणी रेकॉर्डब्रेक गाड्यांची विक्री झाली. गेल्या नऊ दिवसांत राज्यभरात 80693 दुचाकींची नोंदणी झाली आहे.
भारत स्टेज थ्री या इंजिनामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने भारत स्टेज थ्री इंजिन असलेल्या गाड्यांवर बंदी घातली आहे. त्याऐवजी आजपासून फक्त भारत-4 इंजिन असलेल्या गाड्यांचीच विक्री होणार आहे. होंडाने स्कूटरवर तब्बल 13 हजार 500 रुपये इतकी भरघोस सूट दिली होती, तर मोटारसायकलवर तब्बल 18 हजार 500 रुपयांचा डिस्काऊंट दिला होता. त्यामुळे अनेकांनी शोरूमबाहेर गर्दी केली होती.
गाडी पुन्हा विक्रीला काहीही अडचण नाही
दरम्यान, गाडी खरेदी करून, तिची नोंदणीही झाल्यास, ती गाडी पुन्हा विकण्यास काहीही अडचण नाही. कारण एकदा नोंदणी झालेल्या गाडीचा मालक बदलेल. त्यामुळे भविष्यात कोणतेही प्रश्न निर्माण होणार नाहीत, असेही व्यवस्थापकांनी सांगितले आहे. इड-खखख इंजिन असलेल्या जुन्या गाड्यांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. यापुढे इड-खखख इंजिन असलेल्या गाड्यांची खरेदी-विक्रीच बंद करण्याचा निर्णय कोर्टाने दिला होता.