वरणगाव- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण, मुंबई फिरते विधी सेवा केंद्राच्या माध्यमातून येथे झालेल्या लोकअदालतीत शहरातील नऊ मोटर व्हेईकल प्रकरणातील तक्रारींचा तडजोड करून निपटारा वरणगाव पोलिस स्थानकाच्या आवारात करण्यात आला. गोरगरीबांचा न्यायालयात येण्यासाठी लागणारा वेळ वाचावा तसेच पैशांची बचत व्हावी या उद्देशान शासनाने फिरते न्यायालय आपल्या दारी संकल्पन सुरू केली आहे. प्रसंगी भुसावळ तालुक्याचे न्या.एस.एल.वैद्य यांनी काम पाहिले. अॅड.एस.के.चौधरी, ए.आर.पाटील, के.आर.पाटील व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.