जळगाव । तारखेवर आलेल्या मद्यपी दिपक हरी सुरवाडे (वय-40, रा. समतानगर) या तरूणाने न्यायालयात आराडा-ओरड करून गोंधळ घातल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडला. न्यायालयाने पोलिसात कळविल्यानंतर शहर पोलिसांनी न्यायालयात येऊन मद्यपी तरूणास ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
दिपक सुरवाडे हा समता नगरातील रहिवासी असून त्याच्याविरूध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा खटला न्यायालयात सुरू आहे. न्या. प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात खटला सुरू असल्यामुळे मद्यप्राशन करून दिपक हा मंगळवारी तारखेवर आला होता. सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास न्यायालयात कामकाज सुरू असताना त्याने आरडा-ओरडा करत करण्यास सुरूवात करून गोंधळ घालत परिसरातील शांतता भंग केली. तात्काळ न्यायालयातील कर्मचारी शहर पोलिस ठाण्यात मद्यपी तरूणाविरूध्द कळविल्यानंतर डिबी कर्मचारी नवजीत चौधरी व सुनिल पाटील यांनी न्यायालयातकडे धाव घेत मद्यपी दिपक यास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर नंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.