न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी बहुजन मोर्चाला यशस्वी करा

0

भुसावळ : मराठा आरक्षणासह अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, कोळी समाजाला जात प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच जळगाव विमानतळास महर्षी वाल्मिकी यांचे नाव देण्यात यावे, भुसावळ शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा स्थापन करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात येणार असून यात सहभागी होण्याचे आवाहन मोर्चाचे प्रचारक जगन सोनवणे यांनी केले. या मोर्चासंदर्भात भिमालय कार्यालयात सर्व समाजबांधवांची बैठक घेण्यात आली.

11 रोजी काढणार मोर्चा
ठाकूर, धनगर, मुस्लिम, बौध्द, मराठा, कोळी व लिंगायत समाजबांधवांच्या विविध मागण्या मार्गी लावण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर 11 जानेवारी रोजी बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात जगन सोनवणे यांच्या कार्यालयात नियोजन करण्यात आले.

या आहेत मागण्या
भुसावळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाचा विकास करावा, इंदूमिलचा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावावा, रिक्षाचालक मालक व मोलकरीण संघटनेचे प्रश्‍न सोडवावे, मुस्लिम आरक्षण, सच्चर कमिटी, रेनके आयोग लागू करणे अशा विविध मागण्या मोर्चादरम्यान जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केल्या जातील.

यांची होती उपस्थिती
या बैठकीत विविध 10 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात संतोष मेश्राम, गणेश बारसे, राकेश बग्गन, पुष्पा सोनवणे, संगिता ब्राह्मणे, बबलू सिद्दीकी, चंद्रकला कापडणे, राजू डोंगरदिवे, दिपक अडकमोल, मोतीराम कोळी, अशोक कोळी, गजानन कांबळे, आरिफ शेख, गोपी साळी, तुषार शिवपुजे, सदानंद शिवपुजे, निलेश देशमुख, संतोष वाणी, नाना संन्यास आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी केले.