शहादा । शेतकरी, शेतमजूर हा राब-राब राबून देखील मालाला भाव मिळत नाही. न्याय हवा असेल तर संघटीत राहावे लागणार. क्रांती भरल्यापोटी नव्हे उपाशी पोटी होत असल्याचे प्रतिपादन सातपुडा तापी परीसर सहकारी कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांनी केले. शहादा तालुक्यात जलयुक्त शिवार अंतर्गत पाणी नियोजन बाबत सहविचार सभा सातपुडा साखर कारखाना येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.
विविध अधिकारी-पदाधिकार्यांची उपस्थिती
सुतगिरणीचे व्हा. चेअरमन रोहिदास पाटिल, साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष किशोर नरोत्तम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापति सुनिल पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, डी. एच. पाटिल, हैदर नुरानी, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष जगदिश पाटील, जिल्हा परीषद सभापती आत्माराम बागले, अॅड.प्रमोद पटेल, दिलीप गांगुर्डे, अशोक टिला पाटील, ईश्वर मंगेश पाटील, निंबा दोसले, माधव पाटील आदि उपस्थित होते.
पाणी असून नियोजन नाही
पाटील पुढे म्हणाले की, शेतकरी हा सामान्य कुटुंबातील आहे. सर्वच शेतकरी संघटीत झाल्याशिवाय क्रांती होणार नाही. नाले पाणी नसल्याने कोरडे पडले, सिंचन नाही, पाणी आहे तर नियोजन नाही. कै. पी. के. आण्णा पाटील यांनी तापी नदीवरून जल उपसासिंचन योजना सुरू केली होती. अवसायनात अनेक संस्था गेल्या माञ कै. आण्णांनी अवसायनातील संस्था वाचविल्या आहेत, असे पाटील म्हणाले.
अनेक शेतकर्यांची उपस्थिती
या परीसरात कै. आण्णासाहेबांनी शेतकर्यांच्या मालकीचे सहकार प्रकल्प उभे केले आहेत. या माध्यमात कोणा एकाही व्यक्तीचे नुकसान आण्णासाहेबांकडून झाले नाही. हिच परंपरा यापुढे सुरू राहणार आहे. परीसरातील शेतकरी शेतमजुर, कार्यकर्त्यांनी सकारात्मक भुमिका ठेवल्यास विकास निश्चित होणार. सर्वांनी एकञ राहुन काम करायचे असे दिपक पाटील यांनी सांगितले. यावेळी किशोर पाटिल, दिलीप गांगुर्डे, राजेंद्र माळी आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुञसंचलन के. डी.पाटील यांनी केले.