नवी दिल्ली। सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टाच्या 7 न्यायाधीशांच्या पिठाने न्यायधीश कर्णन यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवून सहा महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश न्यायाधीश कर्णन यांनी फेटाळला आहे. ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने सकाळी 11 वाजता आदेश दिला. तर मी 11 वा. 20 मिनिटांनी तो आदेश रद्द करण्याचा आदेश दिला आहे. ते माझ्या साक्षीला प्रसिद्धी माध्यांमामध्ये न छापण्याचा आदेश कसा देऊ शकतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. चेन्नईतीली शासकिय निवासस्थानी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने न्या. कर्णन यांच्या कोणत्याही वक्तव्याला प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसिद्धी देऊ नये, असा आदेश दिला होता. त्यावर त्यांनी एक लिखित उत्तर दिले असून त्यात ते म्हणतात, ‘मी कुणी असामाजिक तत्व आहे का? किंवा मी कुणी दहशतवादी आहे का ? ते माझ्या वक्तव्यांना प्रसिद्धी देऊ नये असा आदेश प्रसिद्धी माध्यमांना कसा देऊ शकतात? मी अटक आणि जेलला घाबरत नाही. सर्वोच्च न्यायालयाने माझी बाजू न ऐकता मला दोषी कसे ठरवले?’त्यांना जेव्हा जेलमध्ये जाण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की मी अनेकदा जेलचा दौरा केला आहे. मी नेपोलियनसारखा आहे, तसंच मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दत्तक पुत्र आहे. तर ते म्हणतात मी वेडा आहे. जर ते मला वेडा समजतात तर मग ते मला जेलमध्ये का पाठवत आहेत? सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा लागू होण्यासारखा नाही. त्यामुळे मी हा आदेश फेटाळत आहे. मी सात न्यायाधीशांच्या भ्रष्टाचाराबाबत नाही, तर न्यायपालिकेत चालणार्या भ्रष्टाचाराविषयी बोललो होतो.