राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी
मुंबई :- न्यायमूर्ती ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी होणार नाही, असा स्पष्ट निर्णय देत सुप्रीम कोर्टाने लोया यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगत या संदर्भातली याचिका फेटाळली आहे. न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर नंतर विविध स्तरावर प्रतिक्रिया उमटत असून शव विच्छेदन अहवालावर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला असून लोया यांचे पोस्ट मार्टेम करणारे डॉ.मकरंद व्यवहारे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी ही मागणी केली.
हे देखील वाचा
यावेळी मलिक म्हणाले कि, न्याय मिळतोय ही स्तिथी आता देशात राहिली नाही. दिवंगत न्यायमूर्ती लोया यांच्यासंदर्भात सर्वोच्च नाययालयाने दिलेल्या निकालानंतर लोकांची अशी भावना झाली आहे . लोया यांच्या शव विच्छेदन अहवालावर आधारित हा निकाल देण्यात आला आहे. नागपूर मेडिकल कॉलेज मध्ये ज्यांच्या अधिकारात शव विच्छेदन अहवाल तयार केला, ते डॉ. मकरंद व्यवहारे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मेव्हणे आहेत. नागपूर मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक लॅबचे ते प्रमुख होते. पदावर कार्यरत असताना 2015 साली व्यवहारे शव विच्छेदन अहवाल बदलतात असा आरोप त्यांच्याच विद्यार्थ्यांनी केला होता, 2014 साली ही त्यांनी अहवाल बदलला नसेल हे कशावरून ठरवायचे असा सवाल देखील मलिक यांनी केला.
त्यामुळे लोया प्रकरणातले सत्य बाहेर काढायचे असेल तर डॉ. व्यवहारे यांची नार्को टेस्ट करावी,अशी मागणी मलिक यांनी केली. या प्रकरणात अनेक गोष्टी आश्चर्यकारक आहेत, अनेक वेळा उच्च न्यायालयात खटला अथवा याचिका दाखल झालेली असताना सर्वोच्च न्यायालय संबंधित प्रकाराने आधी उच्च न्यायालयाने निकाली काढावीत असा आग्रह धरतात , मात्र या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असे त्यांनी म्हटले.