न्यु इंग्लिश स्कुल सहसचिवासह तीन कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

0

जामनेर। येथील न्यु इंग्लीश स्कुल या संस्थेचा वाद आता वेगळ्याच वळणावर पोहचला असून संचालक मंडळाच्या वादात शिक्षिकवर्ग व कर्मचारी यांच्यातही आपापसात दोन गट पडून वाद न मिटता वाढतच आहेे शेवटी हे वाद पोलीस स्टेशनच्या पायरीवर येवून धडकले आहे

सस्ंथेचे सहसचिव पारस ललवाणी यांनी फत्तेपूर येथील संस्थे कार्यरत असलेल्या शाळेचे शिक्षक मनोज हिरामण मेश्राम व शिक्षीका दुर्गा त्र्यंबक माळी यांना सोबत घेऊन कार्यालयात येत जबरदस्तीने मस्टरवर शाळा सुरु झाल्याच्या तारखेपासून स्वाक्षरी करण्याचा घाट घातला. त्यांच्या विरोधात पर्यवेक्षक भिमराव रुपचंद चौधरी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यालयीन प्रमुख अनिल सैतवाल यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला मात्र त्यांनी अटक होवून जामीनावर सुटका करण्यात आली आहे. पारस ललवाणी, शिक्षक मेस्राम, शिक्षीका माळी व कार्यालयीन प्रमुख सैतवाल यांच्या विरोधात कलम 466,353,120(ब)व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.