न्यु इंग्लिश स्कूल पालकसंघाच्या उपाध्यक्षपदी दिलीप कांबळे

0

म्हसळा : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुर संचालित म्हसळा न्यु इंग्लिश स्कूल म्हसळाचे सन 2017/2018 चे शिक्षक माता पालक उपाध्यक्षपदी म्हसळा नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. म्हसळा तालुक्यातुन इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत न्यु इंग्लिश स्कूल मध्ये सुमारे दोन हजार विध्यार्थी शिक्षण घेत आहेत 24 सदस्य असलेल्या कमिटीवर सचिवपदी माजी सरपंच अपेक्षा कलमकर, सहसचिव पदी लक्ष्मण म्हात्रे, तज्ज्ञ शिक्षक सदस्य रहाटे गुरुजी यांचे सह अन्य 20 मातापालक सदस्यांची निवड करण्यात आली. शाळा आणि विद्यार्थी अडिअडचणीं बाबत थेट पालकांजवळ संवाद साधण्याच्या उद्देशाने शाळा प्राचार्य व्ही.एन.माळी यांनी आयोजीत केलेल्या सभेला स्कूल चेअरमन समीर बनकर, माजी अध्यक्ष नितीन बोरकर, सदस्य अरुण माळी, प्रमोद खोत, सुनील उमरोटकर, स्वदेशचे इंजिनियर प्रसाद पाटील, संतोष पाणसरे, लक्ष्मण पाटील, शेवालेसर, रहाटे गुरुजी, आर.के.पाटील, मंगेश कदम, सदस्य लक्ष्मण म्हात्रे, अनिल टिंगरे, श्रवण कोकचा, सुधाकर चोगले, प्रकाश जाधव, सदस्या प्रीती दातार, जयदास कांबळे, अनंत पवार आदि मान्यवर शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.