न्यूझीलंडकडून भारताचा मानहानिकारक पराभव !

0

हॅमिल्टन: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात एकदिवसीय मालिका झाली. भारताने मालिका जिंकली, मात्र शेवटच्या चौथ्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची उणीव चौथ्या वन-डे सामन्यात प्रकर्षाने जाणवली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्करली. सलामीवीर माघारी परतल्यानंतर मधल्या फळीत भारताचा डाव सावरणे एकाही फलंदाजाला जमले नाही आणि भारताचा संपूर्पण संघ ९२ धावांवर माघारी परतला. न्यूझीलंडने हे लक्ष्य ८ गडी राखत फक्त ८८ चेंडूत पूर्ण केले. वन-डे क्रिकेट इतिहासात भारताचा हा सर्वात मानहानिकारक पराभव ठरला.