न्यूझीलंडला मायदेशात टीम इंडिया व्हाइट वॉश देण्यास सज्ज !

0

तॉरुंगा : न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्याच्या टी-२० मालिकेत भारताने आतापर्यंत ४-० अशी आघाडी घेतली आहे. अतिशय अविस्मरणीय अशी ही मालिका ठरली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या दोन्ही सामन्यात सुपर ओव्हरची लढत झाली. यात टीम इंडियाने विजय संपादन केले. दरम्यान आज शेवटचा सामना होत आहे. हा सामना जिंकून न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत व्हाइट वॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. भारतीय संघाचा प्रचंड आत्मविश्वास वाढला असून न्यूझीलंड संघ प्रचंड दबावात असणार आहे. भारताला आता न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत ५-० असे निर्भेळ यश खुणावते आहे. रविवारी या मालिकेतील पाचवी अन् अखेरची टी-२० लढत रंगणार असून दुणावलेला आत्मविश्वास आणि सूर बघता यजमान न्यूझीलंडपेक्षा सहाजिकच भारतीय संघच विजयासाठी फेव्हरिट समजला जातो आहे. घरच्या मैदानावर रंगणाऱ्या दोन संघांमध्ये टी-२० मालिकेतील तीन किंवा पाचही लढती गमावण्याची नामुष्की न्यूझीलंड संघावर केव्हाच आलेली नाही.