न्यूझीलंडला 311 धावांचे आव्हान

0

कार्डिफ । न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. पण त्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखले होते. त्यामुळे न्यूझीलंडच्या खात्यात इंग्लंडसारखे दोन गुण नसले तरी त्यांचे पारडे जड समजले जात आहे.इंग्लंडने जर न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकला तर त्यांना बाद फेरीत पोहोचण्याची नामी संधी असेल.इंग्लंडने न्यूझीलंडला 311 धावांचे आव्हान दिले.या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन हा कर्णधार पदाला साजेशी कामगिरी करू शकला नाही,तो अवघ्या 13 धावांवर बाद झाला. मात्र यष्टीरक्षक जॉस बटलर याने चांगली फलंदाजी करित 61 धावा केल्या तो नाबाद राहिला.अ‍ॅलेक्स हेल्स (56),जो रूट (64),यांच्या अर्धशतकी खेळीमुळे बेन स्टोक्स 48 धावा याच्या जोरावर चॅम्पियन्स ट्रॉफीत आज सहाव्या मॅचमध्ये इंग्लंडने 49.3 षटकात सर्व बाद 310 धावा केल्या आहेत.शेवटचे दोन्ही फलंदाज शुन्यावर बाद झाला.न्युझीलंडची सुरवात चांगली झाली नाही.पहिल्या षटकाच्या चौथ्या चेडूवर संघाची धावा संख्या 1 असतांना सलामीवीर ल्यूक रोंची हा शुन्यावर बाद झाला.

न्युझीलंडने नाणेफेक जिकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंग्लंड कडून सलामीला जेसन रॉय व अ‍ॅलेक्स हेल्स आले. संघाला चांगली सुरवात देत असतांना संघाची धावसंख्या 37 असतांना सलामीवीर जेसन रॉय केवळ 13 धावावर े मिल्नेने बोल्ड केले. रॉय बोल्ड झाल्यानंतर जो रूट आला.त्यांनी धुव्वाधार फलंदाजी करित संघांची धाव संख्या 118 असतांना अ‍ॅलेक्स हेल्सने आपले अर्धशतक पुर्ण केले.त्यानंतर मिल्नेने हेल्सला 56 धावांवर बोल्ड केले.इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन हा फलंदाजीला आला.मात्र तो नावाप्रमाणे खेळी करू शकला नाही.मॉर्गन हा वैयक्तीक 13 धावावर असतांना एडरसने झेल बाद केले.बेन स्टोक्स फलंदाजीला आला असता त्याने 53 चेडूत 48 धावा केल्या.जो रूटने आकर्षक फटकेबाजी करत 3 चौकार आणि 2 षटकारासह अर्धशतक ठोकले.रूट 64 धावांवर खेळत असतांना एडरसने बोल्ड केले. बेन स्टोक्सने 53 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारासह 48 धावा केल्या. त्याला बोल्टने झेलबाद केले.जॉस बटलर व मोईन अली मैदानावर खेळत होते. एकीकडे बटर गोलंदाजाचा समाचार घेत होता.तर दुसरीकडे एडरसने मोईन अली याला 12 धावावर झेल बाद केले. अलिद रशिद हा 12 धावावर असतांना सेंटनर ने बाद केले. लायम प्लकेट हा खेळण्यास आला त्याने बटलर याना साथ देण्याचा प्रयत्न केला मात्र तो 15 धावांवर खेळत असतांना मिल्ने याने बाद केले. तर सामन्याच्या शेवटच्या षटकाच्या दुसर्‍या व तिसर्‍या चेंडूवर मॉर्क वुड व बॉल या दोन्ही फलंदाजाना शुन्यावर बाद केले.

इंग्लंडचे फलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत, पण गोलंदाजांना मात्र अजूनही लय सापडलेली दिसत नाही. बांगलादेशविरुद्ध अ‍ॅलेक्स हेल्स, जो रूट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी नेत्रदीपक फलंदाजी करत इंग्लंडला लीलया आव्हान पूर्ण करून दिले होते. पण गोलंदाजीमध्ये मात्र इंग्लंडला फार मेहनत घ्यावी लागणार आहे.

न्यूझीलंड तिन्ही आघाड्यांवर सरस
न्यूझीलंडचा संघ तिन्ही आघाडयांवर सरस आहे. त्यांचे क्षेत्ररक्षण चांगले होत आहे. गोलंदाजीमध्ये अ‍ॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊथी चांगल्या फॉर्मात आहेत. मिचेल मॅक्कि्लनॅघनसारख्या गुणवान वेगवान गोलंदाजाला पहिल्या सामन्यात संधी देण्यात आली नव्हती. कोरे अँडरसन आणि कॉलिन डी’ग्रँडहोमसारखे दर्जेदार अष्टपैलू त्यांच्या ताफ्यात आहेत. फलंदाजीमध्ये कर्णधार केन विल्यमसन ही त्यांचा हुकमी एक्का असेल. गेल्या सामन्यात ल्यूक राँचीने धडाकेबाज खेळी साकारली होती,