मुंबई: न्यूझीलंडला ५-० ने व्हाईट वॉश देऊन भारतीय संघाने टी-२० सामन्यात ऐतिहासिक मालिका विजय मिळविला आहे. आता न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना होणार आहे. बीसीसीआयने आज मंगळवारी ४ रोजी सकाळी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी संघाची घोषणा केली. कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ रोहितच्या खेळीला मुकणार आहे. दुखापतीमुळे रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. रोहितच्या जागी मयांक अग्रवालची वनडे संघात निवड करण्यात आली आहे.
कसोटी संघात रोहितच्या जागी शुभमन गिल याचा समावेश करण्यात आला आहे. धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉला देखील न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.
मयांक अग्रवाल याला वनडे संघात स्थान देण्यात आले आहे. तो राहुल आणि पृथ्वी शॉ यांच्यासह तिसरा सलामीचा फलंदाज असेल. तर कसोटी संघात रोहितच्या अनुउपस्थितीत राहुल आणि पृथ्वीला शुभमन गिलची साथ असेल. गिलने न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ८३ आणि नाबाद २०४ धावा केल्या होत्या. त्याआधी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात सलामीचा फलंदाज म्हणून तो मैदानात उतरला होता.
भारतीय कसोटी संघ
विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, इशांत शर्मा (फिट असेल तर संघात समावेश होईल)