‘न्यूटन’ला केंद्र सरकार 1 कोटी देणार

0

मुंबई । मराठमोळा तरुण प्रयोगशील दिग्दर्शक अमित मसूरकर याचा ’न्यूटन’ हा चित्रपट भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठी निवडण्यात आला आहे. ’न्यूटन’द्वारे संवेदनशील आणि चांगला विषय हाताळण्यात आल्याने या चित्रपटाला केंद्र सरकार 1 कोटी रूपयांचं घसघशीत अनुदान देणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून एक कोटी रूपयांचं अनुदान मिळणारा ’न्यूटन’ हा पहिला सिनेमा ठरला आहे. हा सिनेमा ऑस्करचा दावेदार ठरल्याने मराठी कलावंत आणि दिग्दर्शकांकडे जगाचे लक्ष वधेले आहे.

निवडणुकीचे कथानक
’न्यूटन’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. त्याच दिवशी या चित्रपटाला ऑस्करसाठी पाठवण्याची हैदराबादमध्ये घोषणाही करण्यात आली. या चित्रपटातून राजकीय भाष्य करण्यात आलं आहे. नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये निष्पक्षपातीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी जीवाचा आटापिटा करणार्‍या एका निवडणूक अधिकार्‍याच्या भोवती हा सिनेमा फिरतो. हे पैसे चांगल्या व संवेदनशील चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात आले आहेत, तसेच चित्रपटाचा विषय दिग्दर्शकाने चांगल्या पद्धतीने मांडला आहे. त्यामुळे या चित्रपटाला केंद्र सरकारनं अनुदान दिल्याचं निवड समितीचे अध्यक्ष सी.वी.रेड्डी यांनी सांगितले. राजकुमार राव या चित्रपटात निवडणूक अधिकार्‍याच्या भूमिकेत दिसणार आहे, नूतन कुमार असे त्यांच्या व्यक्तिरेखेचे नाव असून त्यांने भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर, त्याला नक्षलग्रस्त भागात निवडणूक अधिकारी म्हणून जावं लागतं.