न्यूयॉर्कमध्ये शक्तिशाली स्फोट

0

मॅनहॅटन : न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरजवळ शक्तिशाली स्फोट झाल्याची वृत्त आहे. मॅनहॅटन येथील एका बस स्टँडवर हा स्फोट झाला. हा दहशतवादी हल्ला आहे की नाही हे उशीरापर्यंत समजू शकले नव्हते. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचेही वृत्त आहे. स्फोटानंतर पोलिसांनी या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे थांबवली होती.

मॅनहॅटनच्या 42 स्ट्रीट जवळ हा स्फोट झाला. या परिसरात जे लोक आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. बस टर्मिनलच्या जमिनीखाली पाईपमध्ये बॉम्ब लपवला गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्फोटाचा मोठा आवाज होताच नागरिक सैरावैरा पळत होते. काही लोक सब वेमध्ये अडकल्याने त्यांनाही पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी हलविले.