न्यू इंग्लिश मीडियम स्कूलला मल्लखांब स्पर्धेत प्रथम

0

घोडेगाव : येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे न्यू इंग्लिश मीडियम स्कूल व लायन्स क्लब ऑफ शिवनेरी यांच्यातर्फे नागपंचमी महोत्सव आणि मल्लखांबाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुले व मुलींच्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले.

नारायणगाव येथे झालेल्या या स्पर्धेत विविध शाळांतून मुलामुलींचे संघ सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुलींच्या व मुलांच्या संघाने प्रथम पारितोषिक मिळवून सन्मानचिन्ह रोख रक्कम व प्रशस्तिपत्रक प्राप्त केले. विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक नवनाथ निर्मळ यांनी मागदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजित काळे, कार्याध्यक्ष सुरेश काळे, विद्यालयाच्या प्राचार्या मेरीलोरा डिसोझा यांनी केले. या स्पर्धामध्ये पूजा सोमा शिखरे, सृष्टी सुदर्शन आवटे, प्रज्ञा ईश्वर सैद, सिद्धी प्रवीण आनंदराव, तनिष्का प्रमोद सैद, वैष्णवी शशी अहिवळे, जागृती जगदिश गोडसे, स्वराली मनोज घोलप, संस्कार प्रकाश तिटकारे, आर्यन अनिल वरे, आदिनाथ नामदेव पोखरकर, सिद्धांत सुरेश एरंडे, आदिनाथ सोमनाथ जंबुकर, पार्थ राजेश डामसे, आदित्य राजेंद्र काळे, गुरूराज प्रशांत सराफ सिद्धांत सतिश भंडारे, समर्थ नितीन नांगरे, वरद वैभव विधाते, ओम सचिन काळे, अथर्व अवधुत शिंदे, हर्ष विनोद पोकर, अथर्व संतोष करडिले, आर्य सचिन घोडेकर, श्रेयश अशोक भोर, यश जगन खुटाडे, सागर किशोर कोकणे विद्यार्थिनी सहभाग घेतला होता.