न्यू पुणे पब्लिक स्कूलचे कुस्ती स्पर्धेत यश

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत निगडी येथील न्यू पुणे पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले आहे. योगिता कैलाशचंद्र, पूर्वा जाधेकर, संजना देशपांडे या विद्यार्थिनींनी विविध वजनगटात चकमदार कामगिरी केली. वडमुखवाडी येथे ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.

तिघींनी मिळवले यश
या कुस्ती स्पर्धेत 14 वर्षाखालील 41 किलो वजनगटात न्यू पुणे पब्लिक स्कूलच्या योगिता कैलाशचंद्र हिने तृतीय क्रमांक मिळवला. तर पूर्वा जाधेकर हिने 44 किलो वजनगटात तृतीय क्रमांक मिळवला. तसेच, संजना देशपांडे हिने 32 किलो वजनगटात द्वितीय क्रमांक पटकावला. यशस्वी कुस्तीपटूंना क्रीडाशिक्षक आबाजी माने यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे आकुर्डी-चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश खंदारे व सचिव प्रदीप खंदारे, प्राचार्य लतीफ मणेर यांनी अभिनंदन केले.