न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये गांधी जयंतीनिमित्त प्लास्टिक निर्मूलन पर्यावरण रॅली

0

रहाटणी : येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले एजुकेशन फाऊंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पि. चि. म.न.पा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व महान स्वातंत्र सेनानी लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त प्लास्टिक निर्मूलन पर्यावरण रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेची प्लास्टिक निर्मूलन पर्यावरण रॅली शाळेपासून शिवार चौकातून परत शाळेत नेण्यात आली. यावेळी शिवार चौकात मारू इकोबॅग्स यांच्यावतीने प्लास्टिक बॅग्स व थर्मोकोल यांच्या उपयोगाने पर्यावरणाला होणारे नुकसान व आपल्या शरीराला होणार्‍या हानीबदल जनजागृती केली. कापडी पिशवी व पेपर बॅग्स यांच्या फायद्यानंबदल सांगण्यात आले. कापडी पिशवी व पेपर बॅग्स यांचा वापर करण्यास सांगितले. यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, विकास पाटील, क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे, सह. आरोग्य अधिकारी व्ही. के. बेंडाळे सर, आर. न. सौंदाई , पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव व मधुसुदन मारू उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार आणि मुख्याध्यापिका, शिक्षक इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या बद्दल माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनुराग सरानी केले.