मुंबई । डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठान आणि मराठा मंडळ आयोजित 20 व्या सुशीला वझे स्मृती आंतरशालेय सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत ठाण्याची न्यू होरायझन्स आणि मुलुंडच्या श्रीश्री रवीशंकर विद्यामंदीर संघाने आपापल्या गटांमध्ये विजेतेपद मिळवले.
न्यू होरायझन्स स्कूलने इयत्ता 7 वी ते 8 वीच्या गटात 20 पैकी 16 गुणांसह अव्वल स्थान मिळवले तर श्री श्री रवीशंकर स्कूलने इयत्ता 6 वीपर्यंतच्या गटात बाजी मारली. इयत्ता 10 वी पर्यतच्या गटात अंबरनाथचा पी एम एम रोटरी स्कूलचा संघ विजयी ठरला. त्यांनी 20 पैकी 14.5 गुण मिळवून पहिले स्थान मिळवले.