न्हावीत घरफोडी : 58 हजारांचा ऐवज लंपास

0

फैजपूर- जवळच असलेल्या न्हावी गवातील तुकारामवाडील रहिवासी पंकज रोहिदास चोपडे यांच्या घरातून चोरट्यांनी 58 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. ही घटना 11 ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. ज्ञात चोरट्यांनी चोपडे यांच्या घराचा मागील दरवाजा उघडून घरात प्रवेश करत बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचे लॉकर तोडूनत त्यामध्ये ठेवलेल्या 18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चार हजार रुपये रोख असा एकूण 58 हजार रुपये किंमतीचा ऐवज या अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. रविवारी सकाळी चोपडे कुटुंबियांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत फैजपूर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व उपनिरीक्षक आधार निकुंभ करत आहे.