फैजपूर। न्हावी येथील उर्दू शाळा क्रमांक 1 मध्ये सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ घेण्यात आला. प्रास्ताविक सैय्यद हैदरअली जहुरअली यांनी केले. मुख्याध्यापक ऐहतेशाम हुसेन नवाजअली व पिंजारी शेख मोहम्मद शेख करीम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी जब्बारखान शब्बीरखान, किताब परबत तडवी, अफरोज बेगम, मेहबूब कुरेशी, सलिमखान जाबिरखान, सै. खालेदा जमिल मोहसिन, शे. आबिद शे. इस्माईल, सै. सदिका जहागिर तडवी, शे. सादिक शे. दाऊद, रेशमा अजिज पिंजारी, सै. रस्तुल हसन तडवी, हमिर सुभान तडवी, इरफान तडवी, आयेशा तडवी, शेख इब्राहिम शेख अहमद, हाजी सत्तार खान, शब्बीर खान, असलम खान आदी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी यांनी केले सहकार्य
प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख गुलाम दस्तगीर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी रऊफ शेख हनिफ, काझी फैजानुद्दीन, अ. रफिक अली, सै. मो. शकिल अली, महेबूब तडवी, मो. हनिफ आदींनी सहकार्य केले.