न्हावी गावात तीन तलवार जप्त : आरोपी तरुणाला अटक
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची गोपनीय माहितीवरून कामगिरी
भुसावळ : यावल तालुक्यातील न्हावी येथील तरुणाकडून जळगाव गुन्हे शाखेने तीन तलवार जप्त केल्या असून या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. केतन मधुकर पाटील (27 वाणीवाडा, न्हावी, ता.यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. न्हावीतील तरुणाकडे घातक उद्देशाने तलवार असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने शनिवारी कारवाई करीत तीन तलवार जप्त केल्या तसेच तरुणाला अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, हवालदार महेश महाजन, हवालदार अक्रम शेख याकुब शेख, चालक विजय चौधरी आदींच्या पथकाने केली.