न्हावी परिसरातील रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था

न्हावी प्रतिनिधी दि 21

परिसरातील रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था झाली असून आता तर पावसाचे दिवस सुरू झाले आहेत त्यामुळे या रस्त्यांचे पावसाळ्यात जास्तच दुरावस्था होणार आहे वाहनधारक तसेच शेतकरी वर्गाला शेतात जाण्यासाठी फार मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे,

येथून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरखेडा,तिडया , अंधारमळी, मोह मांडली, तसेच इतर गावाकडे जाणाऱ्या, तसेच या रस्त्याने शेतात जाणाऱ्या या रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली असून रस्त्यावरची खडी पूर्णपणे उखाडालेली असून रोज कामानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या नागरिक तसेच नुकतीच शाळा उघडले असून जाणाऱ्या शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच बरीच मुले कोणी पायी, कोणी सायकलीने मार्गक्रमण करावे लागत असून रस्ता अतिशय खराब झाला असल्याकारणाने सर्वांनाच मोठी कसरत करावी लागत आहे

रस्ते निर्मितीचे सुद्धा इंजीनियरिंग असते

: याचाच विसर आपल्या यंत्रणांना पडलेला दिसत असतो प्रत्येक विकासात्मक कामाकरिता लाखो रुपयाचा निधी उपलब्ध होत असतो, परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षित , व शासनाच्या विविध विभागाला खाल पासून तर वरपर्यंत टक्केवारीचा विळखा लागला असल्याने अनेक रस्त्यांचे बांधकाम भ्रष्टाचाराच्या लागलेल्या किडीने पोखरले गेले असल्याची ओरड होत आहे : बऱ्याच दिवसापासून या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून या परिसरातील लोकप्रतिनिधीं. या खराब झालेल्या रस्त्यांकडे लक्ष देतील का? असा प्रश्न या रस्त्याने नेहमी वापर असलेल्या नागरिक, विद्यार्थी, व शेतकरी वर्ग यांना भेडसावत आहे, या खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी असे मागणी परिसरातील बहुसंख्य नागरिक तसेच शेतकरी वर्गामधून मोठ्या प्रमाणात होत आहे

कोट _

रमजान तडवी उप सरपंच ग्रामपंचायत बोरखेडा बु| बऱ्याच दिवसापासून या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून या रस्त्याने जाण्यासाठी तसेच सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये व शेतात जाण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागत असून आता तर पावसाळा सुरू झाल्याने या रस्त्याने वापर करणाऱ्या सर्व शालेय विद्यार्थी, नागरिक, तसेच सर्व शेतकरी बांधवांना फार मोठा त्रास होणार असून या खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासकीय स्तरावर संबंधित लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग यांनी लक्ष देण्याचे गरज आहे

कोट _

मुरलीधर भारंबे_ बऱ्याच दिवसापासून या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून रोज या रस्त्याने रहिवासी नागरिकांना तसेच सर्व शेतकरी बांधवांना या रस्त्याने येण्या जाण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागते रस्त्याला मोठमोठे गड्डे व खडी पूर्णपणे उघडले असून आता तर पावसाळा सुरू झाला आहे, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग यांनी दुरुस्तीसाठी लक्ष देण्याची गरज आहे